IND A vs ENG A: जैस्वाल, जुरेलसह भारताच्या चौघांची अर्धशतकं, आघाडी घेण्यातही मिळवलेलं यश; पण सामना अनिर्णित

India A vs England Lions, 1st Unofficial Test ends with Draw : भारतीय अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalSakal
Updated on

भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना कँटबरीमध्ये झाला. पण हा सामना अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (२ जून) अनिर्णित राहिला. सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. मात्र पहिल्या सामन्यात गोलंदाजांना फरसा प्रभाव पाडता आला नाही.

या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात ४१ षटकात २ बाद २४१ धावा केल्यानंतर दोन्ही संघांच्या संमतीने हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावातील १२५ षटकापासून ७ बाद ५२७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी जमान अख्तर नाबाद होता.

Yashasvi Jaiswal
INDA vs ENG LIONS: तंदुरुस्तीवरून डावललं त्या सर्फराज खानचा अफलातून झेल Gautam Gambhir ने पाहावाच, Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com