India A vs England Lions: Sarfaraz Khan and Karun Nair Prove a Point on Day 1 : फिटनेसच्या कारणावरून आणि संघात जागा नाही सांगून इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात स्थान न मिळालेल्या सर्फराज खानने आज निवड समितीला चपराक मारली. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातल्या पहिल्या सराव सामन्याला आज सर्फराज खान व करुण नायर यांचा दमदार खेळ पाहायला मिळाला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी केली. इंग्लंड दौऱ्यावर त्रिशतक झळकावल्यानंतरही कसोटी संघातून बाहेर गेलेल्या करुणने पुन्हा एकदा इंग्लिश परिस्थितीत त्याची उपयुक्तता सिद्ध करताना शतक झळकावले.