IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद! भारताची सुरुवातच खराब,नेमकी कशी पडली वैभवची विकेट?

How Did Vaibhav Suryavanshi Lose His Wicket?: भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामन्यात वैभव सूर्यवंशी अवघ्या ११ धावांवर बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट गमावली. त्यानंतर आयुष बडोनीही शून्यावर बाद झाल्याने भारताची सुरुवात अडचणीची झाली.
How Did Vaibhav Suryavanshi Lose His Wicket?

How Did Vaibhav Suryavanshi Lose His Wicket?

esakal

Updated on: 

How Did Vaibhav Suryavanshi Lose His Wicket?: पाकिस्तानने दिलेल्या ३१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. सर्वांचं लक्ष लागलेल्या वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या ११ धावा करून तो माघारी परतला.

त्यानंतर आयुष बडोनीही खाते न उघडताच बाद झाल्याने भारताची सुरुवात अडचणीची झाली आहे. ६ षटकांनंतर भारताच्या २८ धावा झाल्या असून दोन विकेट्स गमावल्या आहेत.

Loading content, please wait...