IND A vs PAK A: नेपाळला लोळवल्यानंतर आता पाकिस्तानशी भिडणार भारत! वैभव सूर्यवंशीसह कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य Playing XI

India's Probable Playing XI Against Pakistan A: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये भारत अ संघाचा सामना २२ नोव्हेंबरला पाकिस्तान शाहीन्सशी होणार आहे. नेपाळला ३०६ धावांनी हरवल्यानंतर भारताची विजयी घोडदौड कायम ठेवण्याचे लक्ष्य असेल. वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांना संधी मिळण्याची शक्यता असून पाहा भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन.
India's Probable Playing XI Against Pakistan A

India's Probable Playing XI Against Pakistan A

esakal

Updated on: 

India's Probable Playing XI Against Pakistan A: एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात नेपाळचा ३०६ धावांनी पराभव केला. नेपाळने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

मात्र, वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. एके काळी भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी शतके झळकावत संघाला संकटातून बाहेर काढले.

Loading content, please wait...