INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

India A vs Sri Lanka A Day 1 highlights and scorecard: साई सुदर्शनच्या शानदार शतकाच्या जोरावर भारत अ संघाने श्रीलंका अ विरुद्ध पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३३३ धावा केल्या. ध्रुव जुरेल आणि शेख रशीद नाबाद.
INDA vs SLA Test

INDA vs SLA Test

esakal

Updated on

India A vs Sri Lanka A Day 1 highlights and scorecard: भारत अ संघ आणि श्रीलंका अ संघात(India A vs Sri Lanka A) गॉल येथे कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा पहिलाच दिवस भारतीय संघाने गाजवला आहे. गुरुवारी म्हणजेच २५ जून रोजी सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वीच भारतीय अ संघाने तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाचा पराभव करून मालिका आपल्या नावावर केली होती. त्या सामन्यात साई सुदर्शनने(sai Sudharsan) शानदार शतक (१३२ धावा) झळकावले होते, तर कर्णधार ध्रुव जुरेलने नाबाद ६८ धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com