
Ajinkya Rahane Solapur: भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय. नुकताच त्याने मुंबई संघाकडून खेळताना सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीही जिंकली. त्याने ही स्पर्धा झाल्यानंतर आता तो सोलापूरला पोहचला आहे. त्याचे सोलापूरमधील काही फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत.