
Syed Mushtaq Ali T20 Trophy Final: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२४ स्पर्धेचे विजेतेपद मुंबई संघाने पटकावले. बंगळुरुला झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश संघ आमने-सामने होते.
या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. यासह दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर नाव कोरले. यापूर्वी २०२२-२३ हंगामात मुंबईने ही स्पर्धा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात जिंकली होती.
अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य मुंबईने १७.५ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. मुंबईच्या विजयासाठी अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीसोबतच अखेरीस सूर्यांश शेडगे आणि अर्थर्व अंकोलेकर यांनी केलेली फटकेबाजी महत्त्वपूर्ण ठरली.