

U19 India vs Pakistan
Sakal
U19 World Cup 2026 Super-6 Schedule: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील शेवटचा साखळी फेरीतील सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह सुपर सिक्समध्ये जाणाऱ्या १२ संघांवर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गटवारीही निश्चित झाली आहे.
साखळी फेरीनंतर सुपर सिक्समध्ये ए गटातून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड हे तीन संघ, बी गटातून भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांनी प्रवेश केला. सी ग्रुपमधून इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे, तर डी ग्रुपमधून अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.