

Vaibhav Suryavanshi - Ayush Mhatre
Sakal
India Won against New Zealand in U19 WC: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत शनिवारी (२४ जानेवारी) बुलावायो येथे भारत आणि न्यूझीलंड संघात सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयात कर्णधार आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी आणि आरएस अंब्रिश यांनी मोलाचा वाटा उचलला. साखळी फेरीतील हा दोन्ही संघांचा शेवटचा सामना होता.
भारताने (U19 India Team) साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडचे यापूर्वीचे दोन सामना पावसामुळे रद्द झाले होते. त्यानंतर भारताने त्यांना पराभूत केले आहे. पण रद्द सामन्यांमध्ये मिळालेल्या २ गुणांसह न्यूझीलंडनेही पुढच्या सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळवला आहे.