India and West Indies may not meet again in Test cricket for decades after the current series.
esakal
भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होणार आहे.
इतिहासात विंडीजने भारताविरुद्ध ३० कसोटी जिंकल्या तर भारताने २३ जिंकल्या आहेत, ४७ सामने अनिर्णीत राहिले.
विंडीजची कामगिरी सुधारली नाही तर पुढील १०० वर्ष भारताविरुद्ध कसोटी मालिकेची संधीच निर्माण होणार नाही.
Why India and West Indies may not play Tests for 100 years: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. उभय संघातील मागील काही मालिका एकतर्फी झाल्या आहेत आणि भारताने सलग ९ मालिका जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने २००२ मध्ये शेवटची मालिका जिंकली होती. वेस्ट इंडिजचा संघ एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत होता आणि त्यांची सध्याची अवस्था पाहून क्रिकेट चाहते खंत व्यक्त करत आहेत.