India Test squad announcement for West Indies LIVE
esakal
India Test squad announcement for West Indies LIVE: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय खेळाडूंची घोषणा गुरुवारी करण्यात आली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आशिया चषक स्पर्धेत खेळणारे खेळाडू या मालिकेत खेळणार की नाही, याची उत्सुकता होती. पण, निवड समितीने आगामी महत्त्वाच्या कसोटी मालिका लक्षात घेता प्रमुख खेळाडूंची निवड केली आहे. २८ सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेची फायनल होतेय आणि २ ऑक्टोबरपासून IND vs WI कसोटी मालिकेला सुरुवात होतेय.