IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

India beat New Zealand in 1st ODI: भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वनडेत पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. भारताच्या विजयात विराट कोहली, हर्षित राणा यांचे मोलाचे योगदान राहिले.
Virat Kohli | India vs New Zealand

Virat Kohli | India vs New Zealand

Sakal

Updated on

India won 1st ODI against New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (११ जानेवारी) वडोदरामधील बीसीए स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळला गेला. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने १-० अशा फरकाने विजय मिळवला.

भारताच्या विजयात विराट कोहलीने (Virat Kohli) मोलाचा वाटा उचलला. विराट गेल्या काही महिन्यांपासून अफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे. या सामन्यातही विराट कोहलीचा दमदार फॉर्म पाहायला मिळाला आहे. त्याने सलग पाचव्या वनडेत ५० धावांचा टप्पा पार केला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४९ षटकात ६ बाद ३०६ धावा करत पूर्ण केला. भारतासाठी केएल राहुलने (KL Rahul) विजयी षटकार मारला. भारताच्या विजयात हर्षित राणाचेही (Harshit Rana) योगदान महत्त्वाचे राहिले. त्याने गोलंदाजीनंतर फलंदाजीत छोटेखानी पण अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केली.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli | India vs New Zealand</p></div>
IND vs NZ, 1st ODI: रोहित शर्माची २६ धावांचीच खेळी, पण दोन सिक्स मारून केला आजपर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com