India Lift Their First Women’s World Cup — Key Moments of the Final
esakal
India Women vs South Africa Women Final Marathi Cricket News : भारतीय महिला क्रिकेट संघाची अखेर स्वप्नपूर्ती झाली... यापूर्वी दोनवेळा फायनलमध्ये पोहोचून जेतेपदाने दिलेल्या हुलकावणीची सल मनाला टोचत होती.. त्यात २०१७ च्या फायनलमधला पराभव जिव्हारी लागलेला... २०२५ मध्ये आलेली संधी काही केल्या सोडायची नाही, याच इराद्याने हरमनप्रीत कौरचा संघ मैदानावर उतरला अन् दक्षिण आफ्रिकेवर विजयाची नोंद करून महिला वन डे वर्ल्ड कप नावावर केला. शफाली वर्मा ( Shafali Verma) या विजयाची नायिका ठरली. भारतीय संघाने २५ वर्षांपूर्वी पाहिलेले वर्ल्ड कप विजयाचे आज सत्यात उतरले..