Mohammed Siraj | England vs India 3rd TestSakal
Cricket
ENG vs IND, 3rd Test: सिराजला इंग्लंडच्या ओपनरसमोर आक्रमक सेलिब्रेशन करणं पडलं महागात! ICC ने सुनावली शिक्षा
Mohammed Siraj Fined for Aggressive Celebration: मोहम्मद सिराजने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या सलामीवीराला बाद केल्यानंतर त्याच्यासमोरच आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं. पण त्याला आता हे सेलिब्रेशन भोवलं आहे. त्याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे.
भारत आणि इंग्लंड संघात सध्या लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. पण या सामन्यात दोन्ही संघांमध्ये गरमागरमी झाल्याचेही दिसले. या सामन्यात वेळ वाया घालवण्यावरून तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या अखेरीस दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले होते. याचदरम्यान आता सिराजला चौथ्या दिवशी आक्रमक सेलीब्रेशन करणे महागात पडले आहे.