Will India win ODI World Cup 2027 without Rohit Sharma and Virat Kohli
esakal
Kris Srikkanth statement on India’s chances in ODI World Cup 2027: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वन डे वर्ल्ड कप २०२७ खेळण्यावर बरीच चर्चा रंगली आहे. रोहित व विराट यांचं वय याला कारण असल्याचे म्हटले जात आहे. पण, या दोघांनी काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत केलेल्या खेळीने सर्वांची बोलती बंद केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या वन डेतही ही दोघं चमकली होती. रोहित ३८ व विराट ३७ वर्षांचा आहे आणि ते २०२७ पर्यंत तंदुरुस्ती व फॉर्म कसा राखतील याबाबत संघ व्यवस्थापनाला अजूनही शंका आहे.