India Beat West Indies in 2nd Test
ESAKAL
भारतीय संघाने दुसरी कसोटी ७ विकेट्सने जिंकून मालिका २-० ने खिशात घातली.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या वाढदिवशी इंडियाने मालिकाविजयाची खास भेट दिली.
भारताने १२१ धावांचे लक्ष्य सहज पार करत मालिका विजय निश्चित केला.
India vs West Indies 2nd Test Marathi Updates : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir Birthday) याला वाढदिवसाला टीम इंडियाने मालिका विजयाची भेट दिली. पहिल्या कसोटीत डावाने पराभूत होणाऱ्या वेस्ट इंडिजने दिल्लीत टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. फॉलोऑन स्वीकारावा लागल्यानंतरही त्यांनी भारतासमोर आव्हान उभे केले आणि कसोटी पाचव्या दिवसापर्यंत खेचली. यजमानानांनी ७ विकेट्स राखून दुसऱ्या कसोटीसह मालिका २-० अशी खिशात घातली.