
Asia Cup 2025
sakal
दुबई : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानला पाच विकेट राखून धूळ चारत आशियाई करंडकाच्या जेतेपदावर रुबाबात मोहर उमटवली. कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंनी पाकिस्तानला १४६ धावांवर रोखल्यानंतर संजू सॅमसन (२४ धावा) याच्यासह तिलक वर्मा (नाबाद ६९ धावा) व शिवम दुबे (३३ धावा) या जोडीने संघ अडचणीत असताना भारताला संकटातून बाहेर काढले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.