India Coaching Staff To Split Into Two Groups Ahead Of New Zealand Test Series; What's The Plan?
esakal
India vs New Zealand Test series coaching staff update: ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने वन डे मालिकेतही २-० अशी आघाडी घेतली आहे आणि मंगळवारी हॅमिल्टन येथे होणारा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा शुभमन गिल अँड टीमचा निर्धार आहे. तिसऱ्या वन डे सामन्यानंतर भारताच्या संघात बदल पाहायला मिळणार आहे. कारण, शुभमन गिलसह काही खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी जाणार आहेत आणि त्यामुळे संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. पण, हा बदल केवळ खेळाडूंपुरता नसेल तर गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir ) सपोर्ट स्टाफमध्येही बदल पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या वन डेनंतर सपोर्ट स्टाफमध्ये दोन गट पाडले जाणार आहेत.