
भारतीय क्रिकेट संघाने ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली. भारतीय संघाच्या या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान राहिले आहे. विशेष म्हणजे गेल्या ८ महिन्यात भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.
यापूर्वी २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे अनेक खेळाडूंसाठी हे पहिले किंवा दुसरेच आयसीसी विजेतेपद आहे.