
भारतीय संघाने रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकली. दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला भारताने ४ विकेट्सने पराभूत केले आणि तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
हा अंतिम सामना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या सर्वोत्तम १२ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात या स्पर्धेत विविध क्रमांकावर आणि क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले.