
इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत शेवटच्या दिवशी भारतीय चाहत्यांना सर्वाधिक विश्वास होता, तो केवळ जसप्रीत बुमराहवर. मात्र त्याला इतर गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि परिणामी भारतीय संघ शेवटच्या सत्रात ५ विकेट्सने पराभूत झाला.
बुमराह भारताचा सध्याच्या सर्वात विश्वासू गोलंदाज आहे. पण आता इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याच खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
सध्या भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेचा दुसरा सामना २ जुलै रोजी बर्मिंगहॅमला खेळवला जाणार आहे. या मालिकेत पहि ा सामना जिंकून इंग्लंड १-० अशा आघाडीवर आहे.