
जसप्रीत बुमराहला सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज का म्हणतात, हे तो सातत्याने सिद्ध करत आहे. ज्या मैदानात गोलंदाजांना फार मदत मिळत नसतानाही बुमराह अनेकदा कमाल करताना दिसतो. त्यामुळे त्याने आत्तापर्यंत अनेक विक्रमही स्वत:च्या नावावर केले आहेत.
आता आणखी दोन मोठे विक्रम त्याच्या नावावर झाले आहेत. भारत आणि इंग्लंड संघात हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहने हे दोन विक्रम नावावर केले आहेत.