
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांमुळे सध्या चर्चेत आला आहे. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य सरकारी योजनेतील घोटाळ्यामध्ये अडकल्याची चर्चा आहे.
अमरोहमधील जोया ब्लॉक येथील पलौला गावात शमीची बहीण-मेव्हणा आणि तिचे दीर यांची नावं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), या केंद्र सरकारच्या योजनेत नोंदवलेली असल्याचे समोर आले आहे.
आता असेही समजत आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास प्रकल्प संचालकांकडे सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.