
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद मिळून वनडे क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय संघाने रविवारी (९ मार्च) अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.
भारताचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. या स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना न पराभूत होता जिंकला. भारताचे गेल्या ८ महिन्यांमधील हे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे, तर एकूण सातवे विजेतेपद आहे.