
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा विजेता झाला. दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे न्यूझीलंड संघाला उपविजेतेपद मिळाले.
तसेच न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू रचिन रवींद्र याला मालिकावीर पुरस्कार मिळाला. मात्र, त्याला मालिकावीर पुरस्कार देण्याच्या निर्णयाला आर अश्विनने विरोध केला आहे.