Shreyas Iyer: 'बॅट माझ्या हातात...' BCCI ने वार्षिक करारातून वगळ्याबद्दल श्रेयस अय्यरनं सोडलं मौन

Shreyas Iyer: बीसीसीआयने श्रेयस अय्यरला 2023-24 वार्षिक करारातून वगळले आहे, याबद्दल आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Shreyas Iyer
Shreyas IyerSakal

Shreyas Iyer News: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसाठी गेला हंगाम संमिश्र राहिला. त्याने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली, पण त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याला पाठीच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीतील उपांत्य पूर्व फेरीतील मुंबईच्या सामन्याला मुकावे लागले.

याचदरम्यान, त्याला बीसीसीआयकडूनही 2023-24 वार्षिक केंद्रिय करारातून वगळण्यात आले. अशी चर्चा होती की तो रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व सामन्यात खेळला नसल्याने त्याला वार्षिक करार दिलेला नाही.

या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. याबद्दल आता श्रेयस अय्यरनेच मौन सोडले आहे. त्याने म्हटले आहे की संवादाची कमी झाल्याने अशा गोष्टी घडल्या, पण फलंदाजी करणे त्याच्या हातात आहे.

Shreyas Iyer
T20 World Cup, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी 'हे' दोन खेळाडू ठरणार एक्स फॅक्टर, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा इशारा

तो त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हणाला, 'माझ्यासाठी वर्ल्ड कप चांगला गेला होता. मला त्यानंतर थोडी विश्रांती घ्यायची होती. माझ्या शरीरावर काम करायचे होते आणि काही विभाग मजबूत करायचे होते. पण योग्य संवाद न साधला गेल्याने काही निर्णय माझ्या बाजूने लागले नाहीत.'

'मात्र, शेवटी माझ्या हातात फक्त बॅट आहे, जी नेहमीच माझ्या हातात असेल. मी कशी कामगिरी करणार आणि स्पर्धा जिंकणार, हे माझ्या हातात आहे. मी विचार केलेला की रणजी ट्रॉफी आणि आयपीएल जिंकणे हे भूतकाळात जे काही झाले आहे त्यासाठी सर्वात चांगले उत्तर असेल.

'मी कृतज्ञ आहे की सर्वकाही योग्य झाले. जे आत्ता आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला भविष्यातही अनेक ट्रॉफी जिंकायच्या आहेत.'

Shreyas Iyer
T20 World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात कोण असणार अंपायर? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मे महिन्याच्या अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या स्पर्धेत त्याने 14 सामन्यांत 351 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com