India equalling Pakistan’s world record of 11 consecutive T20I series victories
esakal
India vs New Zealand 3-0 T20I series result" : भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग ९ ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम काल करून दाखवला. तिसऱ्या सामन्यात भारताने ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा हा सलग ११ वा ट्वेंटी-२० मालिका विजय ठरला आणि या विक्रमासह त्यांनी पाकिस्तानच्या नावावर असलेल्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने २०१६-१८ या कालावाधीत सलग ११ ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या होत्या. भारताने या विश्वविक्रमाशी काल बरोबरी केली.