IND vs NZ 5th ODI: अर्शदीप-सिराजचा धुमाकूळ! भारताचा न्यूझीलंडवर रोमांचक विजय, ७ वर्षांनंतर मायदेशात किवींचा मालिका पराभव

India Seal 3-1 Series Win vs New Zealand : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या वनडेत थरारक विजय मिळवला. त्यामुळे मालिकाही भारताने जिंकली असून न्यूझीलंड मात्र ७ वर्षांनी मायदेशात मालिका पराभूत झाले.
India vs New Zealand 5th ODI

India vs New Zealand 5th ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 5th ODI: भारतीय क्रिकेट संघाने अखेर न्यूझीलंडची मायदेशातील विजयी घौडदौड रोखली आहे. रविवारी (१५ नोव्हेंबर) भारताने न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या वनडे सामन्यात २२ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. न्यूझीलंड ७ वर्षांनंतर आणि ११ अपराजित मालिकांनंतर मायदेशात वनडे मालिका पराभूत झाले आहेत.

भारताच्या या विजयात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांनी गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांनी मिळून ५ विकेट्स घेतल्या, तसेच फलंदाजीवेळी त्यांनी शेवटच्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली होती, जी महत्त्वाची ठरली.

भारताने न्यूझीलंडसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४८.१ षटकात १८७ धावांवर सर्वबाद झाला.

India vs New Zealand 5th ODI
IND vs NZ, 5th ODI, Video: अर्शदीप ११ व्या क्रमांकावर आला अन् पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला; बुमराह-शमीच्या खास क्लबमध्ये सामील
Loading content, please wait...