Shahid Afridi reacts during the ongoing controversy over the IND vs PAK clash in the T20 World Cup
esakal
Shahid Afridi Lauds Team India After T20 World Cup Win : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवला. या संपूर्ण स्पर्धेत भारताला फक्त एक पराभव ( वि. दक्षिण आफ्रिका) पत्करावा लागला. भारताच्या प्रत्येक विजयात संघातील कोणता ना कोणता खेळाडू चमकला. या १५ जणांच्या संघातील कोणताही खेळाडू निवडला असता तरी त्याने संघालाव मिळवून दिला असता, असा दावाही शाहिद आफ्रिदीने केला आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स सारखाच खेळला आणि त्यामुळेच ते जेतेपदाचे दावेदार ठरले, असेही तो म्हणाला.