
दुबई : आयसीसीच्या टी-२० प्रकारातील क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचेच वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत आहे. टी-२० वर्ल्डकप पटकावणारा भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा, गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमरा अन् अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पंड्या पहिल्या स्थानावर कायम आहेत.