
रविवारी (९ मार्च) भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने १२ वर्षांनी, तर एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. त्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा विक्रम मागे टाकला आहे.