
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकले आहे. भारताने रविवारी दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघाचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे.
भारताने १२ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी २००२ मध्ये सौरव गांगुली आणि २०१३ मध्ये एमएस धोनी यांच्या नेतृत्वात भारताचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले होते.
या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४९ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला.