
शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (६ जुलै) इतिहास घडवला आहे. भारताने रविवारी बर्मिंगहॅममधील ऍजबॅस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय संपादन केला.
भारताने इंग्लंडला या सामन्यात ३३६ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. यासोबतच भारताने मोठा इतिहास घडवला. भारताच्या विजयात कर्णधार शुभमन गिलसह वेगवान गोलंदाज आकाश दीपचेही मोलाचे योगदान राहिले.
भारताने ५८ वर्षांत पहिल्यांदाच ऍजबॅस्टनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी कधीही भारताला ऍजबॅस्टनमध्ये कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. पण रविवारी या मैदानात भारताने पहिल्यांदा कसोटी सामन्यात विजय मिळवला. याआधी या मैदानात भारतीय संघ एक सामना अनिर्णित राहिला होता, तर ७ सामने पराभूत झाला होता.