

Abhishek Sharma - Suryakumar Yadav | India vs New Zealand 1st T20I
Sakal
India Smash Record 238/7 vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला टी२० सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारली. तसेच या सामन्यात तीन मोठे विक्रमही झाले आहेत.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारतीय संघ (Team India) प्रथम फलंदाजीला उतरला. भारताने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांच्या आक्रमणामुळे २० षटकात ७ बाद २३७ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामन्यात भारताने उभारलेली ही सर्वात मोठी धावसंख्या (Highest T20I totals vs New Zealand) ठरली.