

Abhishek Sharma | India vs New Zealand 1st T20I
Sakal
India set 239 runs Target for New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात नागपूरमध्ये बुधवारी (२१ जानेवारी) टी२० मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यातील पहिला डाव अभिषेक शर्माने गाजवला आहे. त्याने आक्रमक खेळता अनेक विक्रम नोंदवले आहेत.
त्याच्या वादळी खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) २३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने हे न्यूझीलंडविरुद्ध टी२०मध्ये ठेवलेले सर्वात मोठे लक्ष्य आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. भारताकडून अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. सॅमसनने आक्रमक सुरुवात केली होती. पण तो दुसऱ्या षटकात दोन चौकारांनंतर ७ चेंडूत १० धावा करून बाद झाला. काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर रचिन रवींद्रने त्याचा झेल घेतला.