

Rishabh Pant - Dhruv Jurel | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test : भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टनला सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात भारताने चौथ्या दिवशी पहिला डाव घोषित करताना ३५२ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
भारतासाठी केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी शतके ठोकली, तर यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतके केली. भारताने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.