IND vs NZ, 1st Test: रिषभ पंतचा सिक्स अन् शतक! एका झटक्यात ५ रेकॉर्ड्सची नोंद, दिग्गजांच्या यादीत दणक्यात एन्ट्री

Rishabh Pant Century Records : रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत शतक ठोकले आहे. यासह त्याने ५ मोठे विक्रम करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
Rishabh Pant | India vs New Zealand 1st Test

Rishabh Pant | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने खणखणीत शतक केले आहे. त्याने भारताच्या पहिल्या डावात शतक करत अनेक विक्रमही केले आहेत.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताच्या केएल राहुलने शतक केले होते, त्यानंतर आता चौथ्या दिवसाच्या (रविवार, २२ नोव्हेंबर) पंतनेही शतक (Rishabh Pant) केले आहे. विशेष म्हणजे पंतसाठी हा पुनरागमनाचा सामना आहे. दुखापतीमुळे तो बराचवेळ मैदानापासून दूर होता. या कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या भारत अ संघाच्या मालिकेतही त्याला खेळता आले नव्हते. पण आता पुनरागमन करताच त्याने पु्न्हा कसोटीतील तो प्रमुख फलंदाज का आहे, हे दाखवून दिले आहे.

Rishabh Pant | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: केएल राहुलचं शतक, तर जैस्वाल, गिल, पडिक्कल अन् पंतची फिफ्टी; भारताबाहेर टीम इंडियाने रचला नवा इतिहास
Loading content, please wait...