

Daryl Mitchell - Will Young | India vs New Zealand 2nd ODI
Sakal
New Zealand Beat India in 2nd ODI: बुधवारी (१४ जानेवारी) न्यूझीलंड संघाने भारताविरुद्ध दुसऱ्या वनडेत ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. राजकोटला झालेल्या या सामन्यातील विजयामुळे न्यूझीलंडने मालिकेतील आव्हान कायम राखले आहे.
आता तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असल्याने तिसरा सामना निर्णायक असणार आहे. दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडच्या विजयात डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) आणि विल यंग (Will Young) यांनी मोलाटा वाटा उचलला. मिशेलने त्याच्या अफलातून फॉर्म कायम करताना शतकही साजरे केले.