
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ या भारत आणि इंग्लंड संघात होत असलेल्या कसोटी मालिकेतील सलग तिसरा सामना पाचव्या दिवसापर्यंत रंगला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातील निकाल पाचव्या दिवशी लागल्यानंतर आता लॉर्ड्सवर होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकालही पाचव्या दिवशी लागणार आहे. तिसऱ्या कसोटीतील चार दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून आता पाचवा दिवस (१४ जुलै) निर्णायक आहे.