

Team India
Sakal
India need 216 runs against New Zealand: भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी खेळला जात आहे. विशाखापट्टणमला होत असलेल्या सामन्यात न्यूझीलंडचे फलंदाज आणि भारतीय गोलंदाजांमध्ये चांगली जुगलबंदी पहिल्या डावात पाहायला मिळाली. तरी न्यूझीलंड संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला असून भारतासमोर विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडकडून टीम सिफर्टने आक्रमक खेळताना अर्धशतकही साकारले.
भारताला (Team India) हा सामना जिंकायचा असेल, तर २१६ धावांचे विक्रमी लक्ष्य पार करावे लागेल. एवढे मोठे लक्ष्य भारतात अद्याप आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पार झालेलं नाही. त्यामुळे भारताला विजय मिळवायचा असेल, तर इतिहास घडवावा लागेल.