

Ishan Kishan
Sakal
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील चौथा सामना विशाखापट्टणम येथे बुधवारी खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला असल्याने मालिकाही खिशात घातली आहे.
मात्र आता मालिकेत पूर्ण वर्चस्व ठेवण्याचा भारताचा (Team India) प्रयत्न आहे. तसेच न्यूझीलंड (New Zealand) प्रतिष्ठेसाठी आता खेळेल. याशिवाय टी२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वीचे हे दोन्ही संघांसाठी अखेरचे सामने असल्याने त्यादृष्टीनेही दोन्ही संघ तयारी करत आहेत.