
India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पाचवा सामना दुबईत रविवारी भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघात चुरशीची लढाई दिसून येत असून पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी पाकिस्तानच्या फलंदाजांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय गरजेचा आहे, तर भारताला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.