IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने चिवट खेळ दाखवला, टीम इंडियाचे पुनरागमन होतेय असे वाटत असतानाच गेम केला

Champions Trophy Semi-Final: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने २५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरे यांनी अर्धशतके केली आहेत.
India vs Australia | Champions Trophy
India vs Australia | Champions TrophySakal
Updated on

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जात आहे. दुबईला होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

दोन्ही संघांनी आत्तापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे आता ते हा सामना जिंकून तिसऱ्या विजेतेपदाकडे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात उत्सुक असतील. तसेच भारताने गेल्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामना खेळला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.

India vs Australia | Champions Trophy
IND vs AUS: टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी ICC ची खेळी; ऑस्ट्रेलियाच्या लढतीपूर्वी घेतला मोठा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com