

Ben Duckett and Joe Root | England vs India
Sakal
England vs India 3rd ODI: रविवारी (१९ जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जवळपास सर्वच फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना संघर्ष करायला लावला.
सलामीवीर बेन डकेटने शतकी खेळी केली, तर जेकब बेथल आणि जो रुट यांनीही अर्धशतके केली. त्यामुळे इंग्लंडने भारताविरुद्ध या सामन्यात अक्षरश: धावांचा डोंगर उभारला. आता हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर ३८८ धावांचे लक्ष्य असणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हा सामना मालिकेतील निर्णायक सामना आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे.