

Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दोघांच्याही भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, मात्र दोघांनीही ऑस्ट्रेलिया आणि त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करत संघातील जागा पक्की केली आहे. त्यामुळे आता हे दोघेही २०२६ वर्षातील सर्व वनडे सामने खेळण्याची शक्यता आहे.