

Big Names Missing in India's ODI Squad for England Tour
Sakal
India ODI Squad for England Tour: भारतीय क्रिकेट संघ आता आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडमध्ये २६ आणि २८ जून रोजी टी२० सामने खेळल्यानंतर इग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यात भारताला टी२० आणि वनडे मालिका खेळायची आहे.
टी२० मालिकेसाठी यापूर्वीच संघाची घोषणा झाली असून आता रविवारी (२१ जून) इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे कारण पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे मालिकेची तयारी या सामन्यांमधून दोन्ही संघ करणार आहेत.