India Squad vs NZ ODI : मोहम्मद शमीचे पुनरागमन? रोहित, विराट, शुभमन यांची जागा पक्की... कसा असेल भारताचा वन डे संघ?

India ODI squad for New Zealand series 2026: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधीही होऊ शकते. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळणार का, याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.
Mohammed Shami | India ODI squad for New Zealand series 2026

Mohammed Shami | India ODI squad for New Zealand series 2026

esakal

Updated on: 

Mohammed Shami comeback in India vs New Zealand ODI series: भुवनेश्वर कुमारचे भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्यानंतर आता मोहम्मद शमीलाही संधी मिळेल अशी चर्चा रंगली आहे. बीसीसीआयने आगामी न्यूझीलंड दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेसाठी नुकताच संघ जाहीर केला. पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत भुवनेश्वरचे जवळपास चार वर्षांनी पुनरागमन झाले आहे. येत्या काही दिवसांत वन डे संघ जाहीर केला जाणार आहे आणि २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच या दौऱ्यावर वन डे संघात कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. अजित आगरकरचा निवड समिती प्रमुख म्हणून कार्यकाळ संपल्यामुळे मोहम्मद शमीची निवड होण्यास काहीच अडचण नाही, असा कयास बांधला जातोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com