
ICC Awards 2024 Winners: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०२४ पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार (आसीसी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू) भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला जाहीर झाला आहे. जसप्रीत बुमराहने २०२४ वर्षात अफलातून कामगिरी केली होती, त्यामुळेच त्याला हा सन्मान मिळाला आहे.
सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू २०२४ पुरस्कारासाठी बुमराहसह इंग्लंडचा हॅरी ब्रुक, जो रुट आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड यांना नामांकन मिळाले होते. पण बुमराहने ब्रुक, रुट आणि हेड या सर्वांना मागे टाकत आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.