
इंग्लंड आणि भारत संघातील हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत शेवटच्या दिवसापर्यंत चुरस दिसत आहे. दोन्ही विजयासाठी प्रयत्न करत असून सामना रोमांचक वळणावर आहे.
या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे इंग्लंडच्या खेळाडूंसोबत खटकेही उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशीही सिराज इंग्लंडच्या सलामीवीरावर भडकल्याचे दिसले.