
श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघांमध्ये सध्या श्रीलंकेत तिरंगी वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारताची सुरुवात दमदार झाली आहे.
भारतीय संघाने आधी श्रीलंकेला आणि मंगळवारी (२९ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. पण असे असले तरी भारतीय क्रिकेट संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कारवाई करण्यात आली आहे.